Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील 248952 नागरिकांचे होणार सर्वेक्षण…..!

केज तालुक्यातील 248952 नागरिकांचे होणार सर्वेक्षण…..!
केज दि.१५ – ज्याप्रमाणे पोलिओचे जगातून समूळ उच्चाटन झाले त्याचप्रमाणे कुष्ठरोगा सारख्या आजाराचेही उच्चाटन झाले पाहिजे या अनुषंगाने देशात अविरत मोहिम राबविण्यात येत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून सध्या संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध माहीम सुरू आहे
              दि. 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 ग्रामीण भागातील सर्व नागरिकांची आणि शहरी भागातील अति जोखिमीच्या भागांमधील नागरिकांची स्त्री आणि पुरुष कर्मचऱ्या मार्फत तपासणी होणार आहे. यामध्ये कुष्ठरोग संशयित असलेल्याची तपासणी करण्यात येणार असून निदान झाल्यास लागलीच औषोधोपचार देण्यात येणार आहेत. तसेच संशयित क्षयरोग असल्यास दोन बेडका नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यांचे x-रे पण करण्यात आहेत. क्षयरोगाचे निदान झाल्यास त्यांना ही मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे.
        दरम्यान, 49790 कुटुंबातील 248952 नागरिकांचे 175 टिमकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.तरी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना खरी माहिती देऊन त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि या शोध मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version