Site icon सक्रिय न्यूज

एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची केज शहरात मोठी कारवाई……! 

एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची केज शहरात मोठी कारवाई……! 
केज दि.१६ –  महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची गुजरात राज्यातील अहमदाबादहुन पॉंडेचेरीकडे वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पाठलाग करुन केज येथे ताब्यात घेतला. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठीं कारवाई केली.
            अधिक माहिती अशी की, एका गुप्त खबरेमार्फत सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूची पॉंडेचेरी वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो केजकडे येत आहे. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनोज कुलकर्णी, सहाय्यक पोलीस फौजदार मुकुंद ढाकणे, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, रामहरी भंडाने, राजु वंजारे, देसाई घुले, संजय टुले, यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.                     सदर पथकाने सापळा रचून  गुरुवार दि १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३०  वा. च्या दरम्यान केज-बीड रोडवरील शिक्षक कॉलनी येथे ट्रक क्रमांक (एम एच-२४/ ए यु-७३२२) हा अडवला. आयशर चालक प्रदीप बळीराम सुर्यवंशी व सुमंत व्यंकट माने दोघे रा. हाडोळी ता. निलंगा जि. लातूर यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर ट्रक हा गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून पॉंडेचेरीकडे घेऊन  जात असल्याची माहिती दिली. त्या ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेली प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या ८० गोण्या असल्याचे आढळून आले. प्रत्येक गोणीचे वजन हे २८ किलोग्राम असून एकूण २२ क्विंटल ४० किलोग्रॅम वजन असलेली सुगंधी तंबाखू जप्त केली. सदर ८० पोते सुगंधित तंबाखूची किंमत ही ६०० रु. प्रती किलोग्रॅम प्रमाणे १३ लाख ४४ हजार रु. आहे. तसेच तंबाखूसह ट्रक असा एकूण ४५ लाख ४४ हजार रु. चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
                 दरम्यान, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या फिर्यादी वरून दि. १६ सप्टेंबर रोजी केज पोलिसांत गु र नं ४१४/२०२२ अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) ३०(२) (ए) ५९ आणि भा दं वि १८८, २७२, २७३ व ३२८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version