Site icon सक्रिय न्यूज

बांधावर जाऊन लंपी आजाराची लस द्या – बाळासाहेब ठोंबरे…..!

बांधावर जाऊन लंपी आजाराची लस द्या – बाळासाहेब ठोंबरे…..!
केज दि.१८ – सध्या सर्वत्र लंपी आजारामुळे पशुधन धोक्यात आले आहे.कांही ठिकाणी जनावरांचे लसीकरण होत आहे. मात्र केज तालुक्यात अद्याप लस उपलब्ध झालेली नाही.त्यामुळे तात्काळ लस उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जनावरांना लस देण्याची मागणी काँग्रेसचे बीड जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ठोंबरे यांनी केली आहे.
                लंपी आजारामुळे पशुधन धोक्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्वच बाजार बंद असल्याने जनावरांची खरेदीविक्री बंद आहे.शेतकऱ्यांना दुभती जनावरे घेणे व विकणे ठप्प झाल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर सदर आजाराची व्याप्ती वाढत जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.आपल्या पदरी असलेले पशुधन आजाराच्या विळख्यात येऊ नये म्हणून तात्काळ लस उपलब्ध करण्याची मागणी करत आहे.परंतु इतरत्र लसीकरण सुरू असताना केज तालुक्यात मात्र लस उपलब्ध झालेली नाही. आणि लसीकरणासाठी शेतकऱ्यांना आपली जनावरे दवाखान्यात घेऊन येणे शक्य नाही.त्यामुळे तात्काळ लस उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लसीकरण करण्याची मागणी बाळासाहेब ठोंबरे यांनी केली आहे.
शेअर करा
Exit mobile version