Site icon सक्रिय न्यूज

आर्थिक व्यवहारातून प्राध्यापकाचे अपहरण……! 

आर्थिक व्यवहारातून प्राध्यापकाचे अपहरण……! 

Kidnapped typographic stamp. Typographic sign, badge or logo

केज दि.१९ – भिसी आणि हात उसणे दिलेल्या पैशाच्या व्यवहारातून एका प्राध्यापकांचे जीपमधून अपहरण करीत दोन दिवस विविध ठिकाणी नेऊन मारहाण केली. अपरणकर्त्यांनी ३० लाख रुपये न दिल्यास पत्नी व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन परत आणून सोडल्याची घटना घडली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
    फिर्यादी अविनाश अर्जुन माने ( वय ४४, रा. पोखरी रोड, शारदा नगर, अंबाजोगाई ) हे केज तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी हात उसणे घेतलेले पैसे परत न केल्याने व भिसीच्या व्यवहारातून विजय देवकते, आनंद धायगुडे ( दोघे रा. बनसारोळा ) व अनोळखी दोन अशा चौघांनी संगनमत करून १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दिपेवडगाव ( ता. केज ) येथून अविनाश माने यांना स्कार्पिओ जीपमध्ये बळजबरीने बसवून त्यांचे अपहरण करीत केज, जालना, शिर्डी, अहमदनगर, पाटोदा या ठिकाणी घेऊन जात त्यांना पैशाची मागणी करीत मारहाण केली. अपहरणकर्त्यांनी त्यांना ३० लाख रुपये दे अन्यथा तुझ्या पत्नी व मुलांना जीवे मारून टाकू अशी धमकी देऊन अविनाश माने यांना १७ सप्टेंबर रोजी ९.३० वाजेच्या सुमारास परत आणून सोडून दिले. अशी फिर्याद प्राध्यापक अविनाश माने यांनी दिल्यावरून विजय देवकते, आनंद धायगुडे व अनोळखी दोन अशा चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजाभाऊ राठोड हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version