महाविकास आघाडी सरकारनं मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. यावर अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया देत सरकारला इशारा दिला आहे.
मॉल संस्कृती ही आपली नाही. ती विदेशी संस्कृती आली. आताचे सरकार मॉलमध्ये वाईन (Wine) विक्रीचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. पण तसं झालं तर नाइलाजास्तव आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल असा इशारा अण्णांनी दिलाय.
मॉलमधील वाईन विक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. आता यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.
दरम्यान, मॉलमध्ये वाईन विक्रीविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आता पुन्हा अण्णांनी सरकारला इशारा दिला आहे.