Site icon सक्रिय न्यूज

केज – बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघात…..! 

केज – बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघात…..! 
केज दि.२४ – केज बीड रोडवर एक मोटार सायकल आणि क्लासेस च्या गाडीचा अपघात होऊन त्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
            केज बीड रोडवरील कोरेगाव ते मस्साजोग दरम्यान सदर अपघात शनिवारी दुपारी झाला आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच डॉ.विजयप्रकाश ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, बालासाहेब तांदळे, पत्रकार गौतम बचुटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मकरंद घुले यांच्या रुग्णवाहिकेतून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.
               भागवत कल्याण पवार, दिपक कल्याण पवार आणि सुनील मधुकर शिंदे रा. कोरेगाव अशी जखमींची नावे आहेत. तर सदर बस ही बन्सल क्लासेस ची आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version