Site icon सक्रिय न्यूज

निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 755 कोटी मंजूर……!

निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 755 कोटी मंजूर……!

नैसर्गिक आपत्तीमधील बाधितांना तातडीने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. सततच्या पावसाने बाधित पण ६५ मि मी. च्या निकषात न बसणाऱ्या राज्यातील आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे.

निकषात बसणाऱ्या ३० लाख शेतकऱ्यांना ३६०० कोटी रुपये यापूर्वीच वितरित केले आहेत. आता आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपये ही मदत निकषात बसत नव्हती. मात्र विशेष बाब म्हणून आज मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. तब्बल ५, ४९, ६४६ हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे.

शेअर करा
Exit mobile version