केज दि.३ – तालुक्यातील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या गंगा माऊली शुगरचा प्रथम बॉयलर प्रदीपन सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. यावर्षी पासून गंगा माऊली शुगर नव्याने शेतकऱ्यांसाठी गाळपास सज्ज झाला असून गाळप मोठया क्षमतेने करणार असल्याचे सांगितले. प्रथम बॉयलरचे पूजन राहुल सोनवणे व त्यांच्या पत्नी रेवती सोनवणे यांच्या हस्ते सपंन झाले. यावेळी महादेव महाराज चाकरवाडीकर, महादेव महाराज बोराडे यांचेसह लक्ष्मणराव मोरे, युवा नेते आदित्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मागील एक वर्षापासून या कारखान्याचे काम सुरू होते. यामध्ये कारखाना प्रशासनाने गाळप क्षमता वाढवली असून इतरही छोटे मोठे काम करून कारखाना आगामी गळीत हंगाम कसा मोठया स्वरुपात गाळप करेल याचे नियोजन केले आहे. व त्याच अनुषंगाने सोमवारी दि.३ रोजी प्रथम बॉयलर अग्नि प्रदिपन सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमास हनुमंत मोरे, अविनाश मोरे, ॲड. अमित पाटील, राहुल सोनवणे, राजेसाहेब देशमुख, सुरेश पाटील, सिद्धार्थ भिसे, पखवाज वादक उद्धव बापू आपेगावकर, लालासाहेब पवार, प्रविण मोरे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अप्पासाहेब इखे, प्रकाश भन्साळी, बाबाराजे देशमुख, किरण पाटील, वसंत मोरे, अविनाश मोरे, पशुपतीनाथ दांगट, प्रविणकुमार शेप, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, प्रताप मोरे, ज्ञानोबा सुर्यवंशी, नवनाथ थोटे, दत्ता चाळक, प्रा.योगीराज मेटे, बालासाहेब तट, बन्सीधर डोईफोडे, यांचेसह डॉ.विखे पाटील सहकारी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक, मुख्य शेतकी अधिकारी, अविनाश अदनाक, चिफ इंजिनियर पतंगे याच्यासह कारखान्याचे सर्व विभागाचे प्रमुख तसेच अमर पाटील, दलील इनामदार, कबिरोद्दिन इनामदार,कपिल मस्के, समीर देशपांडे, लक्ष्मण जाधव, विनोद शिंदे, बंडू भन्साळी, अनंत ठोंबरे, प्रविण खोडसे, राहुल खोडसे, शिवाजी ठोंबरे, दिनकर राऊत, आकाश गायकवाड, मनोज दांगट, विश्वजित पाटील, उपेंद्र शिंदे, आकाश पाटील यांचेसह कर्मचारी, शेतकरी व हितचिंतक मोठया संख्येने हजर होते.