Site icon सक्रिय न्यूज

ठाकरे गटाकडून तीन पर्यायी नावांसह तीन चिन्हांचा प्रस्ताव…..!

ठाकरे गटाकडून तीन पर्यायी नावांसह तीन चिन्हांचा प्रस्ताव…..!
मुंबई दि.९ – उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात आता वादाचा नवा अध्याय सुरु झाला आहे. निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही. यामुळे दोन्ही गटांकडून शिवसेनेला पर्यायी नावाचा विचार सुरु आहे. शिंदे गटाकडून याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मात्र, ठाकरे गटाने पक्षासाठी 3 नावं आणि चिन्हाबाबत 3 पर्याय ठरवले आहेत.
           ठाकरे गटाकडून पक्षाची 3 नावं आयोगाकडे पाठवण्यात आली आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे,शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी 3 नावं ठाकरे गटाने पाठवली आहेत.
ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हाबाबत 3 पर्याय देखील सुचवण्यात आले आहेत. त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय ठाकरे गटाने निवडणुक आयोगाकडे पाठवला आहे.
मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकित नव्या नावाबाबत आणि चिन्हांच्या तीन पर्यायांबाबत निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
नवीन नावासाठी तीन पिढ्यांची नावे वापरून निवडणूक आयोगाला तीन पर्याय देण्यात आले आहेत. ठाकरे गटाने सर्वात पहिले ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ या नावाचा पर्याय ठेवला आहे.हे नाव न मिळाल्यास ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नवे नाव वापरले जाऊ शकते. हे नावही न मिळाल्यास ठाकरे गटाने ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ असा तिसरा पर्याय ठेवला आहे. प्रबोधनकार हे बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांचे नाव आहे.
शेअर करा
Exit mobile version