Site icon सक्रिय न्यूज

शिंदे गटाला मिळाले निवडणूक चिन्ह…..!

शिंदे गटाला मिळाले निवडणूक चिन्ह…..!
मुंबई दि.११ – शिंदे गटाला  ढाल-तलवार चिन्ह  देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबचा निर्णय दिलाय. काल ठाकरे गटाला मशाल  चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्याय देण्यात आले होते. त्यातून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलंय.
                   निडणूक आयोगाने काल दोन्ही गटांना पक्षाची नावं दिली. यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलंय. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं होतं. शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला दुसऱ्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते.  त्यानंतर शिंदे गटाकडून आज ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी तीन चिन्हं देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि त्यामध्ये ढाल आहे. तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटाने पहिल्या पसंतीस दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाने हे चिन्ह शिंदे गटाला नाकारलं आहे. कारण उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version