Site icon सक्रिय न्यूज

वडगाव ढोक येथील पुल गेला वाहुन…..!

वडगाव ढोक येथील पुल गेला वाहुन…..!
गेवराई दि.१३ – दोन दिवसांपासून धो धो पडणाऱ्या पावसाने गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या गावातील मुख्य रस्त्यावरील पुल वाहून गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आणि गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतांना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासुन येथील नागरिकांनी या नविन पुलासाठी मागणी केली होती. परंतु त्यांची दखल प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी घेतलेली नाही. आता तरी या पुलाची परिस्थिती पाहून लवकरात लवकर पाहणी करून नवीन पुलाचे काम चालू करावे अशी मागणी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच रमेश नेहरकर यांनी केली आहे.
            गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक परिसरात अतिवृष्टी झाली असून राज्यभर मुसळधार पाऊस पडत राहिला त्यामुळे पूर्ण गाव जलमय झाले आहे. गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील तीन वर्षापासून वडगाव ढोक गावाच्या जवळून जाणाऱ्या नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा  प्रशासनाने याची दखल घेतली नाही. याचा परिणाम म्हणजे तीन चार वर्षापूर्वी एका नागरिकाला बैलगाडी पुरात वाहून गेल्यामुळे दोन बैलाचे प्राण गमवावे लागले होते.
         दरम्यान, आता तरी प्रशासनाने जागे व्हावे म्हणजे पुन्हा या घटना घडणार नाहीत. रानातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित महसूल विभाग आणि कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून घ्यावेत अशी मागणी ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे
शेअर करा
Exit mobile version