केज दि.१४ – दोघा चोरट्यांनी चालत्या ट्रकवर चढून ताडपत्री लंपास केल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव ( ता. केज ) शिवारात शुक्रवारी ( दि. १४ ) पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास घडली.
ट्रक चालक फेरोजखान जलालखान पठाण ( रा. तेलगाव नाका, बीड ) हे त्यांच्या सहकाऱ्यासह हैद्राबाद जिल्ह्यातील टांडुर येथून ट्रकमध्ये ( एम. एच. २३ डब्ल्यु. २०१८ ) २० टन फरशी भरून केजमार्गे बीडकडे निघाले होते. शुक्रवारी पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास त्यांची ट्रक ही केज – मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव ( ता. केज ) शिवारात आली असता चालत्या ट्रकवर एक चढल्याचे पाहून त्यांनी ट्रक थांबविली. ते ट्रकची पाहणी करीत असताना ट्रकवर असलेल्या दोघा चोरट्यांनी खाली उड्या मारून पळ काढला. त्यानंतर फेरोजखान पठाण व त्यांच्या सहकाऱ्याने त्यांचा पाठलाग केला असता एक ताडपत्री टाकून अंधारात फरार झाले. त्या दोघा चोरट्यानी दुसरी ८ हजार रुपयांची ताडपत्री लंपास केली. ट्रक चालक फेरोजखान पठाण यांच्या फिर्यादीवरून अनोळखी दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे पुढील तपास करत आहेत.