केज दि.२२ – तालुक्यातील एका गावातून शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अडीच महिन्या नंतर ताब्यात घेतले असुन त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक माहिती अशी की, दि. ४ ऑगस्ट रोजी केज तालुक्यातील एका गावातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शाळेत गेली असताना तिला रत्नदिप सुभाष जाधव रा. वाघेबाभळगाव ता. केज याने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी दि. ऑगस्ट २०२२ रोजी मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात रत्नदीप जाधव यांच्या विरुद्ध गु. र. नं. ३३२/२०२२ भा. दं. वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी तपास करून; पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि अनिल मंदे, शमीम पाशा यांच्या पथकाने पुणे येथील तळेगाव दाभाडे येथून दि. २१ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले. पीडित अल्पवयीन मुलीने पोलीस अधिकाऱ्या समोर दिलेल्या जबाबा वरून त्या प्रकरणी रत्नदीप जाधव याच्या विरुध्द लैंगिक अत्याचार आणि बालकांचे लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ नुसार गुन्ह्यांची वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव सारंग हे करीत आहेत.