Site icon सक्रिय न्यूज

नांदूर घाट अनिश्चित कालावधीसाठी बंद……..

केज दि.१६ – केज तालुक्यातील नांदूर घाट येथे दोन कोरोना रुग्ण आढळून आल्याने इतरत्र प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी वरून नांदूर घाट हे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छीन्द्र सुकटे यांनी घोषित केले आहे.
        तर सदरील गावात आढळून आलेल्या दोन रुग्णांमुळे जिल्ह्यासह तालुका आरोग्य विभाग सतर्क झाला असून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची ट्रेसिंग सुरू केली आहे. 9 आरोग्य टीम च्या माध्यमातून 1112 घरातील 5563 नागरिकांचा सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी माहिती दिली.
शेअर करा
Exit mobile version