केज दि.३० – आम्ही जे सप्न घेऊन या कारखान्याची उभारणी केली होती ते स्वप्न आता गंगा माऊली शुगर च्या माध्यमातून नक्की साकार होणार व या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार. कारण ज्यांच्या हातात हा कारखाना दिला आहे त्यांना मोठा अनुभव असून शेतकऱ्यांच्या हिताचे कारखाने त्यांनी चालवले आहेत. तसेच गंगा माऊली शुगर हा कारखाना महाराष्ट्रतील एक नामवंत ब्रँड होईल यात कसलीही शंका नसल्याचे मत खा. रजनीताई पाटील यांनी व्यक्त केले. त्या गंगा माऊली शुगरच्या प्रथम गळीत हंगाम प्रसंगी बोलत होत्या.
केज तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा गंगा माऊली शुगर, अशोकनगर केज या कारखान्याचा प्रथम गळीत हंगामाचा शुभारंभ काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खा.रजनी पाटील यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. यावेळी बोलताना रजनी पाटील यांनी हा कारखाना अनेक अडचणीत असताना देखील आम्ही व माजी मंत्री अशोक पाटील यांना सांभाळला होता आणि आज योग्य माणसाच्या हातात दिला असून ते नक्कीच या माध्यमातून माझ्या भागातील शेतकरी व ऊस उत्पादकांना न्याय देतील याची मला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या कारखान्याच्या कामात मेहनत घेणारे हनुमंत मोरे, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, अविनाश मोरे, प्रविण मोरे यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी बोलताना सांगितले की, हा कारखाना ताई आणि दादांनी मोठ्या कष्टाने उभा केला आहे.आणि याची जाणीव आम्हाला आहे व तो उद्देश आम्ही नक्की पूर्ण करू. खा. रजनी पाटील यांनी टाकलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असे मत यावेळी व्यक्त केले. या भागातल्या शेतकऱ्यांवर सतत ऊसाच्या बाबतीत अन्याय झाला आहे. मात्र आता हा कारखाना शेतकऱ्यांचा असेल सर्वसामान्यांचा असेल आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना देखील योग्य न्याय मिळेल.कारण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू हाच आमचा नफा आहे. त्यामुळे यापुढे या भागतील ऊस उत्पादक शेतकरी यांनी कोणतीही काळजी करू नये असेही मोरे म्हणाले.
———————————————–
माऊलींच्या आशीर्वादाने गंगा माऊली शुगर नक्की नावारूपाला येईल – अशोकराव पाटील
या कारखान्याला कायम ज्ञानेश्र्वर माऊलींचे आशिर्वाद राहिलेले आहेत.व याच भुमिमध्ये हा कारखाना आहे. त्यामुळे गंगा माऊली शुगर हा कारखाना भविष्यात आपल्या भागातील शेतकऱ्यांची वाहिनी बनेल यात शंका नाही. या भागातील शेतकऱ्यांना योग्य न्याय हा आपला कारखाना देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
————————————————
कार्यक्रमाला प्रकाश महाराज बोधले, श्री. देशमुख महाराज, जाधव महाराज, माजी आमदार त्रिंबक भिसे, शंकरराव भिसे, उपाध्यक्ष हनुमंत मोरे, आदित्य पाटील, राजेसाहेब देशमुख, अमित पाटील, नारायणराव जाधव, राहुल सोनवणे, प्रविण मोरे, अविनाश मोरे, आपासाहेब इखे, पशुपतिनाथ दांगट, प्रकाश भन्साळी, अमर पाटील, प्रवीणकुमार शेप, बाळासाहेब ठोंबरे, डॉ. विखे पाटील कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक पवार, शेतकी अधिकारी अविनाश आदनाक, चिफ इंजिनियर श्री.पतंगे यांचेसह कारखान्याचे सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.