केज दि.३० – बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशाची सेवा करणाऱ्या एसटीला प्रवाशांनी आपल्या मनातुन प्रतिसाद देत अविरत पाठिंबा दिलेला आहे.परंतु अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असुन नाहक वेळ वाया घालवावा लागत आहे.
धारुर ते स्वारगेट पुणे या गाडीचे दिनांक ३०-१०-२०२२ रोजी सकाळी साडेसात वाजताच्या गाडीचे तिकीट पञकार चंद्रकांत पाटील यांच्या मुलांसाठी आॕनलाईन आरक्षीत केले होते. केज बसस्थानकात सकाळी सात वाजल्यापासुन गाडीची वाट पहात उभे असताना धारुर आगाराची एकही गाडी स्वारगेट मार्गे रवाना झाली नाही. नंतर साडेनऊ वाजता विभागीय नियंञक यांना चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली व आगार प्रमुखाचा नंबर दिला.मात्र तब्बल सहावेळा फोन लावुनही फोन उचलण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. शेवटी केज नांदुर चौसाळा मार्गे साडेनऊ वाजता वेगळ्याच गाडीत बसवले.
दरम्यान, वाहक शिंदे यांना विनंती करुन तिकीट बदली करुन देऊन ज्या गावाला जायचेच नाही त्या गावाचा प्रवास करीत महामंडळाच्या कारभारावर नापसंती व्यक्त करीत प्रवास करावा लागला. आता यापुढे एसटीचे आॕनलाईन तिकीट आरक्षीत करावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.