केज दि.३ – मागच्या चार दिवसांपूर्वीच तालुक्यातील देवगाव येथील एका वीस वर्षीय तरुणाने बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून आत्महत्या केली होती.आणि आज पुन्हा तालुक्यातील नांदूरघाट येथे 35 वर्षीय युवकांने नापिकी तसेच वडिलांच्याकडे असलेल्या कर्जाच्या चिंतेतून नदी पात्रातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय त्रिमुखे असे मृत तरुणाचे नाव आहे.
सदरील विवाहित तरुणाने सततच्या नापिकी आणि त्याच्या शेतकरी असलेल्या राजाराम त्रिमुखे वडिलांच्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून गुरुवार दि. 3 नोव्हेंबर रोजी नदी पात्रातील बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची माहिती मिळताच पोलीस नाईक अशोक मेसे आणि रशीद शेख हे घटनास्थळी पोहोचले. संजय त्रिमुखे यांच्या पाश्चात आई वडील, पत्नी आणि एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.