Site icon सक्रिय न्यूज

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने घेतला महत्वपूर्ण निर्णय……!

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने घेतला महत्वपूर्ण निर्णय……!
 दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. बोर्डाने फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर असणार आहे आणि बारावी बोर्डासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असणार आहे. बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
            दहावी बोर्ड परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी आता 25 नोव्हेंबरपर्यंतची मुदत असेल याआधी ही मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत होती, ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. तर बारावी बोर्डाच्या परीक्षेचे आवेदन पत्र विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबर ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. बारावी बोर्ड परीक्षेसाठी याआधीची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत होती. यामध्ये आता वाढ करण्यात आली असून बारावीच्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
                      विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक याआधीच जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार, बारावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक असून बोर्डाकडून निश्चित वेळापत्रक येत्या कांही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
शेअर करा
Exit mobile version