बीड दि.९ – राज्य निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसह राज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज बुधवारी (दि.०९) जाहीर केला. या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.
आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, स्थानिक तहसीलदार निवडणुकांची नोटीस १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करतील. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ५ डिसेंबर रोजी प्राप्त अर्जांची छाननी होईल. ७ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील तर याच दिवशी चिन्हे वाटप करण्यात येऊन उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत मतदान होईल आणि २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील एकूण ७०४ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये केज तालुक्यातील देवगाव,पिपळगव्हाण,कोठी,जिवाचीवाडी/तुकूचीवाडी, नागझरी,धर्माळा,कासारी,तांबवा,लाडेवडगाव,कळंबअंबा,केकतसारणी,चंदनसारगाव,ढाकेफळ,कुंबेफळ
जोला,पिसेगाव,कानडीमाळी,साबला,कोरेगाव,लव्हरी,मसाजोग,शिरूरघाट/गदळेवाडी,एकूरका,नाव्होली,सारणी सां,
दैठणा,सांगवी सा,माळेवाडी, राजेगाव,सारूळ,टाकळी,
वरपगाव/ कापरेवाडी,हनुमंत पिंप्री,आनेगाव,बोरगाव,चिंचोली माळी/सारुकवाडी, मांगवडगाव,हादगाव,केवड,
साळेगाव,सोनी जवळा, भाटुंबा,सारणी आंनदगाव,शेलगाव गांजी,सातेफळ,सोनेसांगवी,धनेगाव,बावची,सादोळा,गोटेगाव,जवळबन, सावळेश्वर,लाडेगाव, कौडगाव,दिपेवडगाव,उमरी,कानडीबदन
इस्थळ,आनंदगाव,सौंदाना,डोका,औरंगपूर,आवसगाव,बेलगाव / केळगाव,पळसखेडा इत्यादी गावांचा समावेश आहे.