Site icon सक्रिय न्यूज

बीडच्या काँग्रेस टीम ने घेतली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत भेट……!

बीडच्या काँग्रेस टीम ने घेतली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत भेट……!
केज दि.९ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच यात्रेत बीड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले असून याच दरम्यान नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे बीड जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली.
           काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा.रजनीताई पाटील यांच्यासह माजी मंत्री अशोक पाटील, आदित्य पाटील, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी भेट घेऊन यात्रेला शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी सर्वांशी संवाद साधत आगामी काळात काँग्रेस हाच देशाला मजबूत पर्याय असल्याचे सांगितले.
शेअर करा
Exit mobile version