Site icon सक्रिय न्यूज

अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे वाहन लुटीच्या घटना……!

अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे वाहन लुटीच्या घटना……!

केज दि.१० – केज -कळंब रस्त्यावर मांगवडगाव पाटी नजीक सुमारे चार वर्षांपासून अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनांचा वेग कमी होताच चालत्या वाहनावर चढून चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. याला रस्त्यांचे मंदगतीने काम करणारी मेगा कंपनी जबाबदार आहे.

             सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी वाहन चालक बाळु सुग्रीव गदळे (रा. दहिफळ वडमावली ता. केज) त्याची ट्रक क्र. (एम एच-१० /सी आर-९४६६) हा सोयाबीनचे पोते भरून अहमदपुरहून कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपुरकडे जात होता. त्याचे वाहन केज-कळंब रोडने जात असताना मांगवडगाव फाट्या जवळ खराब-कच्या रस्त्ययामुळे वाहनाचा वेग कमी करताच रात्री १०:४५ वा. च्या सुमारास अज्ञात चोरट्यानी गाडीवर चढुन ट्रक मधील सोयाबीनचे पोते काढण्याचा प्रयत्न केला. ही चोरीची घटना लक्षात येताच वाहन चालकाने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यानी वाहन चालक याच्या खिशातील दोन हजार रूपये काढून घेतले आणि त्याच्या डाव्या दंडास चावा घेवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला.ट्रक चालक बाळू गदळे याच्या तक्रारी नुसार दि. ८ नोव्हेंबर रोजी संशयित चोरटे अजय रमेश विटकर (रा. वाघोली जि. पुणे), राम संतोष पवार आणि निखील बाळु पवार वय दोघे (रा. दक्षिण वडगाव जि. सोलापुर) आणि कृष्णा हनुमंत जाधव (रा. राळेगाव जि. उस्मानाबाद) यांच्या विरुद्ध गु. र. नं. १९७/२०२२ भा. दं. वि. ३९४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
            युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक औटी हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version