Site icon सक्रिय न्यूज

पिकअप मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर……!

पिकअप मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू एक गंभीर……!

केज दि.१० – मोटारसायकल ला पिकअप ने पाठीमागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.             तालुक्यातील बनसारोळा येथील  रहिवासी लालासाहेब व्यकंट रोकडे हे त्यांच्या चुलते किसन दादाराव रोकडे यांच्यासह दि.९ रोजी सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान मोटारसायकल बोरिसावरगाव बनसारोळा रस्त्यावरून शेतात जात होते. त्या दरम्यान पिकअपने (टाटा मॅजिक) जोराची धडक दिल्यामुळे लालासाहेब रोकडे  (45) यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

            तर श्रीकिसन दादाराव रोकडे यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सदर पिकअपचा ( MH 44 Z 2120) चालक फरार झाला असून पुढील तपास युसुफवडगाव पोलीस करत आहेत.

शेअर करा
Exit mobile version