केज दि.१२ – दहापट पैसे देण्याचे अमिष दाखवत सौरट नावाचा जुगार खेळवताना खेळवणाऱ्या व खेळणाऱ्या वर केज पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील जीवाची वाडी येथील बसस्थानका जवळ सुरेश गोवर्धन लींगस्कर रा. येवता ता. केज व राजाभाऊ बाबुराव सोनवणे रा. मस्साजोग ता. केज जि. बीड हे दोघे दि.11/11/2022 रोजी १.३० वाजता बेकायदेशिररीत्या स्वताचे आर्थीक फायद्यासाठी पप्पु प्लेयींग पिच्चर्स (सौरट) नावाचा जुगार 12 विविध चीत्रावर पैसे लावुन दहापट पैसे देण्याचे आमीष दाखवुन खेळत व खेळवित असताना मीळुन आले.सदर प्रकरणी केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे प्रमुख शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान अश्या जुगाराचे विविध प्रकार ग्रामीण भागातही पोहोचले असून यामध्ये सर्वसामान्य ग्रामस्थांसह अल्पवयीन मुलेही याकडे आकर्षित होत असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचे दिसत आहे.