केज दि.१५ – चक्क समाज मंदिराच्या सभागृहात जुगार खेळणाऱ्या चौघांना केज पोलिसांनी पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील साळेगाव येथील समाज मंदिराच्या सभागृहात जुगार खेळत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार ठाण्याचे प्रभारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी केज पोलीस पथकाने रेड मारली असता निखिल रमेश गायसमुद्रे, भैय्या विष्णू बचूटे, सय्यद इस्माईल गफूर व जालिंदर भानुदास सरवदे हे चौघे पैशावर तिर्र ट नावाचा जुगार खेळताना व खेळविताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व नगदी १९०० रुपये जप्त करण्यात आले.
दरम्यान, गावोगावी समाज मंदिरे ही समाजिक कार्यासाठी म्हणून उभारली गेली असली तरी समाजोपयोगी कामे कमी आणि रिकामटेकड्यांचे ठिकाण जास्त झाल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे.पोलीस नाईक चंद्रकांत शिवाजी काळकुटे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री.गुंजाळ हे करत आहेत.