बीड दि.१५ – जिल्ह्यातील मांडवा येथील शेतकरी पुत्र अविनाश साबळे याने बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदक भारताला मिळवून दिलं. अविनाश ने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं आहे. या आणि यापूर्वीही केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे अविनाश साबळे यास अर्जुन पुरस्काराची घोषणा झाली असून बीडचे नाव देशाच्या पटलावर कोरले आहे.
विशेष म्हणजे अविनाश याने याआधी देखील अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. पण यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती. अविनाशने यावेळी आपली सर्वोत्तम कामगिरी करत 8 मिनिटे 11.20 सेकंद घेत शर्यत जिंकल्यामुळे एक नॅशनल रेकॉर्ड आणि स्वत:चा बेस्टही सेट केला होता. काहीशा फरकाने तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला होता.मात्र त्याच्या अत्युच्च कामगिरीमुळे अविनाश अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणार आहे.
दरम्यान बीडच्या सुपुत्राचे नाव अर्जुन पुरस्काराशी जोडल्या गेल्याने जिल्ह्याची मान उंचावली असून जिल्हावासीय अविनाशचे तोंडभरून कौतुक करत आहेत.