बीड दि.२१ – भाजपाचे युवा नेते बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी प्रिमियर लिगच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचे बक्षिस वितरण खा.डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते होणार असून सैराट फेम रिंकू राजगुरू (आर्ची) सुद्धा उपस्थित राहणार आहे.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. करण्यात आले आहे. वडवणी प्रिमियर लिग या स्पर्धेत मराठा वॉरियर्स विरुद्ध आर.जे या दोन टिम मध्ये अंतिम सामना रंगणार असून या विजेत्या व उपविजेत्या संघाचे बक्षीस वितरण हे खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.तर कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सैराटफेम अभिनेत्री रिंकु राजगुरू (आर्ची) असणार आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के तर माजी.आ.आर.टी. देशमुख, माजलगाव मतदार संघाचे भाजपाचे नेते रमेशराव आडसकर, मोहन जगताप यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.तसेच डॉ.प्रकाश आनंदगावकर, डॉ.स्वरूपसिंह हजारी, नितीन दादा नाईकनवरे, सुखदेव रेडे, सोमनाथ बडे,पोपटराव शेंडगे,अरूण राऊत, ऍड.बालासाहेब चोले, सुधीर ढोले भिमराव उजगरे, गिन्यानदेव राठोड, हरिदास टकले, सचिन सानप, विनय नहार, ईस्माईल पठाण, अरूण मुंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे.
तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक बाबरी मुंडे मित्र मंडळ, वडवणी यांनी केले आहे.