Site icon सक्रिय न्यूज

केज शहरात रॅपिड ॲक्शन फोर्सचे पथसंचलन……!

केज शहरात रॅपिड ॲक्शन फोर्सचे पथसंचलन……!
केज दि.२३ – विशेष दंगल नियंत्रण पथक म्हणून देशभरात सुपरिचित असलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्सची तुकडी बुधवारी केज येथे दाखल झाली. केज शहरातील प्रमुख मार्गावरून शीघ्र कृती दलाने (Rapid Action Force) पथसंचलन केले. यावेळी शीघ्र कृती दलाचे जवान, आरसीपी जवान, पोलिस ठाण्याचे कर्मचारी या पथसंचलनात सहभागी झाले होते.
                अत्याधुनिक मशीन सह शिस्तबद्धपणे रस्त्यावर उतरलेले ७० जवान आधुनिक विशेष वाहने, सोबतीला स्थानिक पोलिस अशा पद्धतीने 23 नोव्हेंबरला केज शहरातील मुख्य रस्त्यामार्गे केंद्रीय राखीव दलाच्या रॅपिड ॲक्शन फोर्सचे (आरएएफ) भारदस्त पथसंचलन झाले. या पथसंचलानातून आरएएफने उपद्रवींना योग्य तो इशारा देत सामान्य नागरिकांना सुरक्षेचा विश्वास दर्शवला आहे. कायदा व सुव्यस्थेचा अभ्यास करण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान विविध जिल्ह्यांत जात आहेत. याद्वारे शांतता व सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन या दलाकडून नागरीकांना केले जाते. नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासोबतच सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा संदेश ही दिला जात आहे.
                  यावेळी डेप्युटी कमांडंट शशिकांत राय (पीएमजी) यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक प्रमोद कुमार, जनसंपर्क अधिकारी रामनाथ डोंगरे व ७० जवान सहभागी झाले होते. यांच्यासह केज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष मिसळे, उपनिरीक्षक वैभव सारंग यासह स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.
शेअर करा
Exit mobile version