केज दि.२४ – केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी आता शाळा, महाविद्यालये आणि आता शहरातील कोचिंग क्लासेस वर लक्ष केंद्रित केले आहे. मुलींना त्रास देणाऱ्या व त्यांचा पाठलाग करणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना दिल्यास त्याचा बंदोबस्त केला जाईल. माहिती देणारांचे नावही गुप्त ठेवले जाईल. असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे. त्यांचे कर्मचारी हे शहरातील क्लासेसला भेटी देणार आहेत.
केज शहरातील सर्व क्लासेस ला पोलीस भेट देणार आहेत. जर तेथील विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी यांनी कोणतीही दखलपात्र तक्रार दिल्यास त्याची दखल घेण्यात येईल. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सोयीस्कर व्हावा आणि कोणत्याही विद्यार्थिनीला शिक्षणामध्ये काहीही अडचण होऊ नये हा त्या मागचा सरळ उद्देश आहे. पालकांच्या मनाप्रमाणे या विद्यार्थिनींचे भाऊ म्हणून पोलीस काम करत आहेत. त्यासाठी सर्व सुजाण नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन ठाणे प्रभारी शंकर वाघमोडे यांनी केले आहे.