अकोला – (16 जुलै) बारावीचा निकाल लागला. अकोला जिल्ह्यातील श्रेयस धांडे हा विद्यार्थीही या निकालात ‘पास’ झाला. मात्र, बारावी च्या निकालात ‘पास’ झालेला श्रेयस आयुष्याच्या निकालात नापास झाला होता. त्यानं आयुष्याची परिक्षा देण्याआधीच जग सोडलं होतं. ही दुर्दैवी कहाणी आहे, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार गावातल्या श्रेयस दिनेश धांडे या मुलाची. श्रेयसनं 18 मे रोजी विषप्राशन केलं होतं. आठवडाभरापर्यंत मृत्यूशी चाललेल्या संघर्षानंतर 25 मे रोजी श्रेयस हे जग सोडून गेला. शेतकरी असलेल्या वडिलांच्या अंगावरील कर्जाचा बोजा आणि त्यांची होणारी तगमग पाहून अस्वस्थ झालेल्या श्रेयसनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं.