केज दि.२८ – गायरानधारकांच्या विरोधात न्यायालयाच्या आडून त्यांना दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या निर्णया विरोधात केज तहसील समोर ३० नोव्हेंबर रोजी गायरान धारकांचे महाधरणे आंदोलनात गायराणधारकांनी सहभागी होण्याचे आवाहन रिपाइंचे केज तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील भूमीहीनांनी सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमणे करून ती कसून कुटुंबाचा चरितार्थ चालविला जात आहे. परंतु ती अतिक्रमणे निष्कसित करण्याचा मा न्यायालयाने दिलेला आदेश हा भूमीहीनांवर अन्याय करणारा आहे. त्यासाठी दि. ३० नोव्हेंबर रोजी रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशाने केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी केज तहसील कार्यालया समोर प्रचंड महाधरणे आंदोलन आयोजित केले आहे. त्या धरणे आंदोलनाला केज तालुक्यातील जास्तीत जास्त गायरानधारकांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केज तालुका रिपाइंचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी केले आहे. दीपक कांबळे आणि त्यांचे सहकारी हे मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड शहराध्यक्ष भास्कर मस्के, राहुल सरवदे यांनी केले आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिलीप बनसोडे, कैलास जावळे, विकास आरकडे, रमेश निशिगंध, बाळासाहेब ओव्हाळ, मिलिंद भालेराव, रणजित कांबळे, राहुल बचुटे, मसू बचुटे आणि सरचिटणीस गौतम बचुटे हे परिश्रम घेत आहेत.