Site icon सक्रिय न्यूज

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा कहर, स्टेअरिंग फिरवून घडवला अपघात……!

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा कहर, स्टेअरिंग फिरवून घडवला अपघात……!

बीड दि.२८ – तालुक्यातील मुळूकवाडी येथे शेतीवादातून धारदार कोयत्याने सपासप वार करुन वृध्द चुलत्याचा खून केल्याची घटना २६ नोव्हेंबरला पहाटे घडली होती.याप्रकारणातील आरोपी पुतण्याला नेकनूर पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर आज (दि.28) मुळूकवाडी येथे स्पॉट पंचनाम्यासाठी घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांची गाडी भरधाव वेगात असताना गाडीचे स्टेरिंग फिरवल्यामुळे कारचा अपघात झाला. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख मुस्तफा गंभीर जखमी झाले असून इतर पोलीस कर्मचारी आणि आरोपीला किरकोळ मार लागला आहे. दरम्यान ससेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जमिनीच्या वादातून बळीराम मसाजी निर्मळ (७५) यांचा रोहिदास विठ्ठल निर्मळने खून केला. तर केशर बळीराम निर्मळ (६५), चोकाजी निर्मळ (८०), कांताबाई निर्मळ (६०) हे हल्ल्यात जखमी झाले होते. नेकनूर पोलिसांनी घटना घडल्यानंतर तातडीने आरोपीला अटक केली होती. आज सकाळी स्पॉट पंचनाम्यासाठी नेकनूर पोलीस ठाण्यातून आरोपी रोहिदासला घेऊन जात असताना त्याने पोलिसांची गाडी सासेवाडी फाट्याजवळ आली असताना गाडीचे स्टेरिंग फिरवले. यावेळी कार वेगात असल्याने  रस्त्याच्या खाली पलट्या मारत गेली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख सय्यद मुस्तफा यांच्यासह  पो.का.खाडे, देशमुख आणि दोन पंच जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून शेख मुस्तफा यांच्यावर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

शेअर करा
Exit mobile version