Site icon सक्रिय न्यूज

महसूल विभागात मोठी भरती, राज्य सरकारचा निर्णय..!

 मुंबई दि.8 – सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात लवकरच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती होणार आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, याबाबतचा आदेश जारी केला आहे. राज्यात तलाठ्यांच्या 3110 पदांसाठी, तर मंडळ अधिकाऱ्यांच्या 511 पदांसाठी भरती होणार आहे.                                          सविस्तर माहिती अशी की, डिसेंबर अखेर किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबतची जाहिरात निघण्याची शक्यता असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात तलाठी भरती झालेली नाहीये. ठाकरे सरकारने तलाठी भरतीची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्याने हा विषय मागे पडला होता. आता पुन्हा तलाठी भरतीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
             दरम्यान, ‘एमपीएससी’मार्फत तलाठ्यांच्या 3110 जागांसाठी, तसेच मंडळ अधिकाऱ्यांच्या 511 जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
          तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच राज्य सरकारच्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे गरजेचे आहे.तर राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
शेअर करा
Exit mobile version