केज दि.१३ – दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात तालुक्यातील माळेगाव येथील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील रविवारी घडली.
बाबासाहेब रोहिदास राऊत (वय 55) हे दि ३.डिसेंबर रोजी सकाळी कार्यालयीन कामासाठी पंचायत समिती कार्यालकडे मोटरसायकलने जात असताना उस्मानाबाद शहरात मागून येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली यात त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी (दि१२) सकाळी निधन झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ ,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.
तर अन्य एका घटनेत वसंत अनंत लोकरे (वय ४०) हे सोमवारी दि १२ रोजी बाजार करून दुचाकीवरून (MH.14.HH.8329)आपल्या गावी परतत असताना केज-कळंब रोडवर तेलेवाडी फाट्याजवळ रात्री 9 च्या सुमारास अज्ञात वाहनासोबत झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे जमादार डोईफोडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह केजच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.त्यांच्या मृतदेहवर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे आई-वडील,पत्नी,दोन मुली ,एक मुलगा असा मोठा परिवार आहे. या दोन्ही घटनेने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.