केज दि.१३ – धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील रहिवासी तथा टिक टॉक स्टार संतोष मुंडे यांचे विजेचा शॉक लागून निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तसेच त्यांच्या समवेत असलेल्या बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे.
संतोष मुंडे यांनी आपल्या विनोदी शैलीत आणि रांगड्या भाषेत टिक टॉक वर धुमाकूळ घातला होता.त्यांचे लाखो फॉलोअर्स होते त्यामुळे दूरदूर वर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.मात्र डीपीवर जाऊन फ्यूज टाकत असताना शॉक लागून मंगळवारी सायंकाळी 6.30 दरम्यान संतोष मुंडे व बाबुराव मुंडे या दोघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.त्यांच्या निधनामुळे कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.