केज दि.१४ – तालुक्यातील सारणी (आ) ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे.तर मागच्या सत्ताधाऱ्यांना आता लोकांनी पुरते ओळखले आहे. यावेळेस सत्ता परिवर्तन करून गावचा विकास झाला पाहिजे या इराद्याने सारणीकरांनी कंबर कसली असून ग्रामविकास परिवर्तन पॅनल ला सत्तेत आणण्यासाठी व राहुल भैय्या सोनवणे व संतोष सोनवणे या तरुण नेतृत्वाच्या पाठीमागे राहण्यासाठी संकल्प केल्याचे दिसत आहे.
मागच्या सत्ताधारी पार्टीने गावातील सर्वसामान्य लोकांना गृहीत धरून विकासाच्या केवळ गप्पा मारल्या.संधी असूनही गावचा विकास झाला नाही.यावेळेस मात्र भूलथापांना बळी न पडता मागे जी चूक झाली ती सुधारण्यासाठी गावची निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतली आहे.गावच्या विकासाच्या कित्येक योजना असूनही त्यांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळालेला नाही.केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे काम आतापर्यंत झाले आहे.
तर दुसरीकडे गावची सत्ता नसतानाही राहुल भैय्या सोनवणे आणि संतोष सोनवणे यांनी गावातील कित्येक लोकांची कामे करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिलेला आहे. त्यामुळे राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असलेल्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने सत्तेत आणून गावचा विकास करणाऱ्या व दूरदृष्टी असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या हाती गावचा कारभार देण्याचा निर्धार मततदारांनी केला असल्याचे दिसत आहे.
ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे संतोष सोनवणे यांच्या पत्नी सौ. प्रणिता संतोष सोनवणे ह्या सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत.तर सदस्य पदासाठी रविकांत पुरुषोत्तम सोनवणे, सुबाबाई अण्णा सोनवणे, विमल लक्ष्मण बनसोडे, दिपक लिंबराज सोनवने, अनिता गोपाळ सोनवणे, कविता श्रीकृष्ण सोनवणे, गोविंद साहेबराव सोनवणे, उषाबाई महादेवसोनवणे तसेच श्रीमंत बाळासाहेब गोरे हे निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन राहुल सोनवणे यांनी केले आहे.