Site icon सक्रिय न्यूज

आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या…..!

आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या…..!
केज दि.१६ – लोकांचे हातउसने घेतलेले पैसे, शेताचे अनुदान वेळेवर येत नसल्याने तसेच सततची नापिकी त्यातून निराश झालेल्या एका ५६ वर्षीय शेतकऱ्याने जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिंचोली माळी येथे दि.१६ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे.
               तालुक्यातील चिंचोली माळी येथील सुभाष भागूजी राऊत यांच्याकडे लोकांचे हात उसने घेतलेले कर्ज होते. तसेच सततची नापीकी व अनुदानही वेळेवर मिळत नसल्याने ते मागच्या कांही दिवसांपासून चिंताग्रस्त होते.यातूनच त्यांनी दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी पावणेसहा वाजता राहत्या घरी स्लॅब च्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
              दरम्यान, मयताचा भाऊ बबन भागूजी राऊत यांच्या खबरेवरून केज पोलीसांत घटनेची नोंद झाली असून ठाणे प्रभारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.मागच्या कांही दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी दिवसेंदिवस संकटात येत असल्याचे दिसून येत आहे.
शेअर करा
Exit mobile version