Site icon सक्रिय न्यूज

दिल्लीमध्ये मानवाधिकार रक्षक पुरस्काराने महाराष्ट्रातील कार्यकर्ते सन्मानित…..! 

दिल्लीमध्ये मानवाधिकार रक्षक पुरस्काराने महाराष्ट्रातील कार्यकर्ते सन्मानित…..! 
गेवराई दि.17 – दिल्ली –  येथे दोन दिवसीय दलित, आदिवासी, भटके विमुक्त, महिला, अल्पसंख्यांक यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय अधिवेशन 13 आणि 14 डिसेंबर रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर हॉलमध्ये ॲक्शन एड संस्थेने आयोजित केले होते. यावेळी देशातील मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.
        महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते कडूदास कांबळे यांना ‘ मानव अधिकार रक्षक ‘ पुरस्कार नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे राष्ट्रीय सेक्रेटरी देवेंद्र सिंग, ॲक्शन एड संस्थेचे डायरेक्टर संदीप छाचराजी, महिला आणि बाल हक्क आयोग दिल्लीच्या चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव ललिता कुमार मंगलम, बाल संरक्षण आयोग दिल्लीच्या शांता सिन्हा, एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
      यावेळी भटक्या विमुक्त आणि आदिवासी साठी काम करणारे अरुण जाधव (अहमदनगर), सुनिता भोसले (पुणे), किरण ठाकरे (शिर्डी) यांचा तर मानवी हक्क, महिला, मुले गायरान जमीन, वन जमीन इ. प्रश्नावर काम करणारे मच्छिंद्र गवाले (नांदेड) , राजेश घोडे, विष्णू मुजमुले (बीड), धोंडीराम पाटोळे (जालना), पप्पू राज शेळके, रघुनाथ कसबे (परभणी), राधिकाताई चिंचोलीकर, भारत बळवंते (हिंगोली), समीक्षा गणवीर (नागपूर) शेख शबाना (सांगली) यांनाही मानव अधिकार रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
        ॲक्शन एड संस्थेचे असोसिएट डायरेक्टर तनवीर काझी ॲक्शन एल्ड संस्थेचे दक्षिण विभागाचे प्रोजेक्ट मॅनेजर मुशकुर आलम यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मानव रक्षक पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी आलेल्या देशातून 27 राज्यांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या कामाची मांडणी करून दलित, आदिवासी, भटके विमुक्त, महिला, मुले अल्पसंख्यांक, असंघटित कामगार यांच्या प्रश्नावर काम कसे करायचे याचेही यावेळी  नियोजन केले.
शेअर करा
Exit mobile version