केज दि.१९ – तालुक्यातील मतदान झालेल्या ६४ ग्रामपंचायतींच्या मतदानाची मतमोजणी तयारी पूर्ण झाली आहे. उमेदवारांसह मतदारांची उत्सुकता शिगेला लागली असून उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.परंतु दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६४ ग्रामपंचायतींसाठी दि.१८ रोजी मतदान झाले. अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीचे निकाल उद्या दि. २० रोजी दुपारी साधारणतः दोन वाजेपर्यंत हाती येतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे.
तहसीलच्या पाठीमागील भागात सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. यामध्ये पाच फेऱ्या होतील. चार फेऱ्यांमध्ये चौदा टेबलवर चौदा ग्रामपंचायत चे निकाल घोषित होतील. तर पाचव्या फेरीत आठ टेबलवर आठ ग्रामपंचायत चे निकाल घोषित होतील.अशा एकूण पाच फेऱ्यांमध्ये ६४ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर केले जातील. सदरील मतमोजणीसाठी पास असल्याशिवाय कुणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी दिली असून नायब तहसीलदार सचिन देशपांडे, लक्ष्मण धस यांच्यासह अन्य कर्मचारी मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घेत आहेत.
दरम्यान, मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.सुमारे दिडशे पोलीस कर्मचारी व नऊ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तर तालुक्यातील संवेदनशील गावातही पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.तहसिल समोरील मुख्य रस्त्यावर नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे प्रभारी शंकर वाघमोडे यांनी दिली आहे.
देवगाव जिवाची वाडी/ तुकुची वाडी कासारी लाडेवडगाव केकत सारणी ढाकेफळ पिसेगाव कोरेगाव मस्साजोग एकुरका सारणी सांगवी राजेगाव वरपगाव/ कापरेवाडी बोरगाव
फेरी क्रमांक 3
पिंपळगव्हान केवड सोनीजवळा सारणी आनंदगाव सोने सांगवी सादोळा कानडी माळी लाडेगाव उमरी इस्थळ दैठना सारूळ पळसखेडा चिंचोली माळी
फेरी क्रमांक 4
मांगवडगाव साळेगाव भाटुंबा सातेफळ धनेगाव माळेवाडी जवळ बन दीपे वडगाव कानडी बदन आनंदगाव सारणी डोका अवसगाव/ वाकडी सांगवी सारणी शेलगाव गांजी
फेरी क्रमांक 5
हदगाव बावची गोटेगाव सावळेश्वर कवडगाव सौंदाना औरंगपूर आणि केळगाव /बेलगाव