Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील रिपाइंच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार…..!

केज तालुक्यातील रिपाइंच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार…..!
केज दि.२२ –  केज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रापंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा रिपाईंच्या वतीने केज येथील शासकीय विश्राम गृहावर सत्कार करण्यात आला.
             केज तालुक्यात रिपाइंचे १७ गावात ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. त्या निमित्त दि.२२ डिसेंबर रोजी केज येथील विश्राम गृहावर रिपाइंचे केज तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाइंचे मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे हे होते. तर प्रमुख पाहुणे जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, शहराध्यक्ष भास्कर मस्के, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, सचिव गौतम बचुटे, राहुल सरवदे, रामधन चाटे आणि दिलीप बनसोडे हे उपस्थित होते.
                    सत्कार प्रसंगी तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागाचा विकास साधावा. त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले आणि पप्पू कागदे यांच्या माध्यमातून विकास निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच विकास कामा संदर्भात अडचणी येत असतील किंवा मागासवर्गीय वस्तीचा विकास निधी इतरत्र खर्च होत असल्यास त्याची चौकशी करण्यासाठी रिपाइं आग्रही राहील. अशी माहिती दिपक कांबळे यांनी दिली.
कार्यक्रमा प्रसंगी सरचिटणीस गौतम बचुटे यांनीही नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजा संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन आणि आभार दिलीप बनसोडे यांनी व्यक्त केले.
               कार्यक्रमाला तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीचे सदस्य रेखा सरवदे, सौ सुरेखा जोगदंड, सौ मंजुषा बनसोडे, उषा ओव्हाळ, विष्णू ओव्हाळ, तारामती आरकडे, गणेश आरकडे, अंगद शिंपले, शशिकांत बचुटे, राहुल बचुटे यांच्यासह केज तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version