Site icon सक्रिय न्यूज

कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट……!

कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट……!
 चीनसह जगभरातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. तसेच चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
              केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईल.
               भारतात आज 201 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे. तसेच देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
           दरम्यान, जगभरात सध्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे.
शेअर करा
Exit mobile version