केज दि.२८ – मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण भारत देशामध्ये हिंदू समाज आणि हिंदू देव देवतांच्या बद्दल बेताल वक्तव्य समोर येऊ लागलेली आहेत.त्यामुळे हिंदू समाज आणि संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याची भावना अनेकांच्या मनामध्ये येत आहे. आणि म्हणूनच हिंदू संस्कृती आणि समाज वाचवण्यासाठी हिंदू धर्म रक्षकांनी एकत्र आले पाहिजे या भावनेतून केज शहरांमध्ये हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा काढण्यात आला.
हिंदू समाज आणि संस्कृतीचा सर्वनाश करणाऱ्या धर्मांतर लव्ह जिहाद अशा सर्व राष्ट्र विघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा बनवुन राष्ट्र व धर्माचे रक्षण करावे इत्यादी मागण्या घेऊन सकल हिंदू समाजाच्या वतीने केज शहरामध्ये हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी तालुक्यातील समस्त हिंदू महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर सदरील मूक मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता. सदरील मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी हिंदू समाज व हिंदू संस्कृती वाचवण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आणि हिंदू धर्म आणि हिंदू समाज वाचवण्यासाठी कडक कायदा करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.