Site icon सक्रिय न्यूज

उस्मानाबादचा तरुण गुजरात पोलिसांच्या ताब्यात

पाकिस्तानला आपल्या कथित प्रेयसीला भेटायला निघालेल्या उस्मानाबादच्या तरुणाच्या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. झिशान सिद्दिकीला आता गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात कलम 3 आणि भादंवि 188 प्रमाणे गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. आता गुजरात पोलिस झिशान खरंच मुलीच्या प्रेमात पडला होता का? की त्याचा आणखी काही हेतू होता? याचा तपास करणार आहेत. दरम्यान झिशानला घेण्यासाठी गेलेल्या उस्मानाबाद पोलिसांना झिशानचा ताबा दिलेला नाही. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरच झिशानला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती आहे.

शेअर करा
Exit mobile version