Site icon सक्रिय न्यूज

मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर….!

मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर….!
केज दि.२९ – मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ३० जानेवारी रोजी मतदान तर ०२ फेब्रुवारी ला मतमोजणी होणार आहे. यावेळेस निवडणुकीत चुरस निर्माण होणार असून भाजपने शिक्षक मतदार संघाची निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
              मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या सदस्याची मुदत सात फेब्रुवारी ला संपत आहे.त्यामुळे मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ०५ जानेवारीला अधिसूचना जारी करण्यात येणार असून १२ जानेवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल.तर १३ जानेवारीला अर्जांची छाननी होईल.अर्ज माघारी घेण्याची तारीख १६ जानेवारी आहे तर मतदान ३० जानेवारीला होणार आहे.आणि ०२ फेब्रुवारी ला मतमोजणी होईल.
          दरम्यान, निवडणूक जाहीर होण्याअगोदर पासूनच मराठवाड्यात शैक्षणिक संस्था चे जाळे असणारे किरण पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या भेटी घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला आहे.त्यामुळे संस्था प्रमुखांसाह शिक्षक वर्गाचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शेअर करा
Exit mobile version