बीड दि.३१ – विनापरवाना व अतिशय निर्दयीपणे मुक्या प्राण्यांना कत्तलीसाठी घेऊन जात असताना नेकनूर पोलिसांनी एक टेम्पो पकडून जनावरांची सुटका केली आहे.
अधिक माहिती अशी की, दि.31/12//2022 रोजी लिंबागणेश ते मांजरसुंबा रोडने एक आयशर टॅम्पो मध्ये गौवंश जातीचे जनावरे भरुन तो बीडकडे जाणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने 11:00 वाचे सुमारास मांजरसुंबा ते लिंबागणेश जाणारे रोडवर लिंबागणेश कडुन एक आयशर कंपनीचा टॅम्पो क्रमांक MH-43-HD-4317 येत असतांना दिसला. त्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो थांबला. त्यानंतर वाहनामध्ये काय आहे याची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवंश जातीचे जनावरे असल्याचे दिसल्याने चालकास जनावराचे बाबत माहिती विचारली असता त्याने उडवा उडवीची माहिती दिली. त्यानंतर चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शफिक मोमिन ईस्माईल रा. मोहमदिया कॉलनी बीड व त्याचे सोबत असलेला क्लीनर याने त्याचे नाव असद जाफर कुरेशी असे सांगितले. चालक व सोबतचे इसमाकडे सदरच्या गोवंश जातीच्या जनावराच्या वाहतुकीचे परवानगीचे कागदपत्रे व वाहनाचे कागदपत्रे अथवा जनावराचे दाखले आहेत काय ? पशुवैद्यकिय अधिकारी यांचेकडुन जनावराची तपासणी करून घेतल्याचे काही कागदपत्रे आहेत काय ? गोवंश जनावरे वाहतुकीचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा परवाना आहे काय ? याबाबत विचापुस केली असता त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही कागदपत्रे व परवाना नसल्याचे सांगितले.
सदर जानावरे कोठुन आणले व कोठे घेवुन जात आहात याबाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. मात्र सदर गोवंश जनावरे हे जामखेड येथुन भरुन गाडी मालक इलाईस सादेक कुरेशी रा. मोहमदिया कॉलनी बीड याचे सांगणेवरुन बीड येथे कत्तल करण्यासाठी घेवुन जात असल्याचे सांगितले. तसेच वाहनामध्ये जनावरे कोंबुन त्याचे पाय बांधुन एकमेकांना बाधुन दाबुन भरलेले दिसुन आले. त्यावेळी पंचासमक्ष पंचनामा केला असता जनावरे व 4.25000/- रु. एक इटकरी रंगाचा आयशर टॅम्पो क्रमांक MH-43-HD-4317 असा एकुण 8,19,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, गोवंश हत्या बंदी असतांना त्यांची कत्तल करण्यासाठी घेवुन जात असतांना शफिक मोमिन ईस्माईल, असद जाफर कुरेशी दोन्ही रा. मोहमदिया कॉलनी बीड व वाहन मालक इलाईस सादेक कुरेशी रा. मोहमदिया कॉलनी बीड यांचे विरुध्द पोलीस शिपाई बालासाहेब रावसाहेब ढाकणे यांच्या फिर्यादीवरून कलम 5 (अ) 1, (ब) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 सुधारणा 2015 सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस कायदा सह कलम 11(1), (a), (i), (h), (d), (i) प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक करणे बाबत अधिनियम 1960, सह कलम 47,48,50,53, जनावराचे वाहतुक नियम 1978 सह कलम 158/177, मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर ठाण्याचे ठाणे प्रमुख विलास हजारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.