केज दि.५ – मागच्या कांही दिवसांपासून एएसपी पंकज कुमावत प्रशिक्षणासाठी गेल्याने अवैध धंद्यांनी डोके वर काढले होते.मात्र आता ते रुजू झाले असून रुजू होताच पोलिसी कारवाया सुरू झाल्या आहेत.
केज ते चिंचोली माळी रोडवर चिंचोली माळी शिवारात जगदंबा धाब्याचा मालक देशी-विदेशी दारू जवळ बाळगून चोरटी विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पंकज कुमावत यांना मिळाली होती. सदरची माहिती मिळाल्यानंतर कुमावत यांनी कारवाईचा आदेश दिला. त्यानुसार पथकातील पोलिस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता दारू विक्री करणारा दीपक शेषराव गायकवाड राहणार चिंचोली माळी हा जागीच मिळून आला. त्याचे ताब्यातून देशी विदेशी व बियरच्या बाटल्या असा एकूण 5595 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यास ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांचे फिर्यादीवरून केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मुकुंद ढाकणे, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजवीर वंजारे महिला पोलीस नाईक आशा चौरे यांनी सदरची कारवाई केली.