केज दि.८ – श्री संत भगवानबाबा यांची पुण्यतिथी व दर्पण दिनानिमित्त केज पत्रकारांच्या वतीने रविवारी येथील हनुमान मंदिर, वकिलवाडी येथे इमर्जन्सी रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिराचे उदघाटन केज चे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये तरुणांनी प्रतिसाद दाखवला.
शिबिराचे समन्वयक हनुमंत भोसले, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, धनंजय देशमुख, धनंजय कुलकर्णी, विजयराज आरकडे, प्रकाश मुंडे, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष हनुमंत सौदागर, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित घाडगे, स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संत भगवान बाबा महाराज पुण्यतिथीचे पदाधिकारी विलास सोनवणे, विजय वनवे, अक्षय गीते, विजय अंडील व सुलेमान काजी यांच्यासह नागिरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अंबेजोगाईच्या शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासला असल्याने रुग्णांना रक्तपेढीत रक्त वेळेवर उपलब्ध होत नसल्याने या रक्तपेढीसाठी इमर्जन्सी रक्तदान शिबिराचे आयोजन येथील संत भगवानबाबा पुण्यतिथी समिती व केज पत्रकारांच्या वतीने या शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरात रत्नाकर साहेबराव नेहरकर, रणजित तात्याराव घाडगे, पांडुरंग विश्वम्भर जाधव, धनंजय भगवानराव कुलकर्णी, अशोक रावसाहेब सोनवणे, महेश रामहरी तांबडे, सुलेमान इलियाज काजी, गौतम लिंबाजी बचुटे, रामराजे वसंतराव साखरे, शिवराज भालचंद्र मूथळे, अशोक मधुकर काळे, ऍड भागवत निवृत्ती ढाकणे, सोमनाथ बजरंग नेहरकर आणि भाऊसाहेब अशोकराव बनसोडे इत्यादींनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने समन्वयक हनुमंत भोसले यांनी अभिनंदन केले.