केज दि.८ – क्लास सुटल्यावर घराकडे स्कुटीवरून निघालेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत एकाने तिची छेड काढल्याचा प्रकार केज शहरात घडली. याप्रकरणी सदरील आरोपीविरुद्ध विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलगी ही तिच्या गावातून स्कुटीवर क्लासला येते. ७ जानेवारी रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास सदरची अल्पवयीन मुलगी ही क्लास सुटल्यावर स्कुटीवरून गावाकडे जात असताना आरोपी शहाबाज सय्यद ( रा. केज ) याने तिचा पाठलाग करीत तिला शहरातील एका शाळेजवळ गाठले. तिची छेड काढली. घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने ही माहिती घरी जाऊन सांगितली. त्यानंतर रात्री ११.०६ वाजेच्या सुमारास सदर मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शहाबाज सय्यद याच्याविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.