केज दि. ९ – केज तालुक्यातील साहित्यिक तथा सहशिक्षक हनुमंत बळीराम घाडगे यांच्या चिकाटी या आत्मकथनाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंकुशराव इंगळे हे होते.तर प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे, ज्येष्ठ साहित्यिक, उद्योजक राजकुमार धुरगुडे पाटील, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, जेष्ठ साहित्यिक मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारी सदस्य दगडू दादा लोमटे, प्रसिद्ध गझलकार प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे, माजी विद्यार्थिनी डॉ. सारिका चौरे,डॉ.पालवे, इंजि तुषार शिंदे, प्रकाशक श्रावण गिरी, जीवन विकास शिक्षण संस्थेचे सचिव जी. बी. गदळे, रानकवी अनिल गव्हाणे, ज्येष्ठ साहित्यिक विश्वंभर वराट गुरुजी, प्रभाकर बोबडे गुरुजी, जनार्दन सोनवणे, हनुमंत भोसले, सीमा गुंड, कवी किशोर भालेराव, डॉ. नवनाथ काशीद, बाबासाहेब हिरवे आदींच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. ठोंबरे यांनी चिकाटी पुस्तकाचे लिखाण दीपस्तंभा सारखे असल्याचे मत व्यक्त केले.लेखक हनुमंत घाडगे यांनी लिखाणातून संघर्षाचा प्रवास कायम मांडत राहणार असल्याचे मत व्यक्त केले.तर अंकुशराव इंगळे म्हणाले, जिद्दीच्या जोरावर माणूस आयुष्य बदलू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंत घाडगे. त्यांनी उत्तम
अध्यापनातून अनेक विद्यार्थी घडवले, दर्जेदार लिखाणाने साहित्य क्षेत्रात भर पडत आहे याचा सार्थ अभिमान आहे असे मत व्यक्त केले. तर डॉ मुकुंद राजपंखे यांनी कृतिशील आणि प्रतिभावंत केजच्या मातीतल्या लेखकाने चिकाटीच्या रूपाने केलेली मांडणी वाचकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत व्यक्त केले.चिकाटी हे पुस्तकात कमी शब्दात उत्तम मांडणी केली असल्याचे मत राजकुमार धुरगुडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हनुमंत घाडगे त्यांची पत्नी मिना घाडगे, अमर घाडगे, वर्षा घाडगे, कृष्णा घाडगे या कुटुंबाचा एकञित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैला इंगळे, मुख्याध्यापक बी. व्ही. गोपाळघरे, उप. मु.अ. बाळासाहेब तिडके, मुख्याध्यापक वसंत शितोळे, प्राचार्य शंकर भैरट, नारायण अंधारे, सरपंच श्री. थोरात, माजी सरपंच बापूराव घाडगे, उपसरपंच महादेव भांगे, श्री. सुरवसे हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले.आभार वर्षा घाडगे यांनी मानले.कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, परिसरातील साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.