Site icon सक्रिय न्यूज

ताणतणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या…..!

ताणतणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या…..!
केज दि.१८ – अतिशय क्षुल्लक कारणावरून टोकाची भूमिका घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे.मागचा पुढचा विचार न करता जीवन संपवण्यापर्यंत मजल जात आहे.आणि अशीच एक घटना केज तालुक्यात समोर आली आहे. तालुक्यातील इयत्ता १० वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनीने रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १६) रात्री उशिरा घडली आहे. अभ्यास करुनही लक्षात रहात नसल्याने पुढे काय होणार ? ही चिंता तिला सतावत होती.
             मयत प्रेरणा किसन डोंगरे रा. कोठी ( ता. केज ) ही विद्यार्थिनी इयत्ता १० वर्गात शिक्षण घेत होती. १० वी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून मार्च मध्ये परिक्षा आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी नेटाने अभ्यासाला लागले आहेत. प्रेरणाही दररोज अभ्यास करत परिक्षेची तयारी करत होती. परंतु केलेला अभ्यास लक्षात रहात नसल्याने ती चिंतेत होती. या चिंतेतून तीने सोमवारी (दि. १६) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घरातील लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर प्रेरणाचे वडील किसन ज्ञानोबा डोंगरे यांनी पोलीसांना दिली.
           सदर घटनेची केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version