Site icon सक्रिय न्यूज

प्रा. किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात……!

प्रा. किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात……!
परळी दि. १७ – मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे भाजप व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे उमेदवार प्रा. किरण नारायणराव पाटील यांनी परळी येथील गोपीनाथ गडावर जाऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे  दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली.
         बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतम मुंडे, प्रवीण घुगे, माजी नगराध्यक्ष अशोक होके,भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांचीही यावेळी उपस्थिती होती.स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या  आशीर्वादाने मला लढण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते असे मत पाटील यांनी व्यक्त केले. प्रचार दौऱ्या दरम्यान सर्व शिक्षकांशी गाठीभेटी घेत प्रचार दौरा सुरू झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version